ऑनलाईन टीम / फ्लोरिडा :
नासाच्या मदतीने शनिवारी पहिल्यांदाच खासगी कंपनीचे अंतराळयान अवकाशात झेपावले. एलॉन मस्क यांच्या SpaceX कंपनीच्या रॉकेटने नासाच्या दोन अंतराळवीरांना घेऊन शनिवारी अवकाशात यशस्वी उड्डाण केले. आज हे रॉकेेट अवकाशातील अमेरिकन स्पेस स्टेशनवर पोहचणार आहे. नासाचे ॲडमिनिस्ट्रेटर जिम ब्राइडेनस्टीन यांनी या लाँचबद्दल माहिती दिली.
फ्लोरिडाच्या केप कनवरल येथील जॉन एफ केनेडी स्पेस सेंटरमधून या रॉकेटने उड्डाण केले. या रॉकेटमधून नासाचे डग हर्ली आणि बॉब बेहनकेन अवकाशात झेपावले. हे दोन्ही अंतराळवीर अवकाशातील अमेरिकन स्पेस स्टेशनवर चार महिने थांबतील. यानंतर ते पुन्हा पृथ्वीवर परततील. अंदाजे 50 वर्षांपूर्वी अपोलो अंतराळयान ज्या तळावरून अवकाशात झेपावले होते.
अमेरिकेने 9 वर्षांत प्रथमच आपल्या भूमीवरून अंतराळात (Astronauts) अंतराळवीर पाठवले आहे. या उड्डाणामुळे व्यावसायिक अंतराळमोहिमांच्या नव्या युगाला प्रारंभ झाला आहे.