प्रतिनिधी / बेळगाव :
निकृष्ट दर्जाच्या पीपीई कीटमुळे वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, परिचारीकांना घामाघुम अवस्थेतच रुग्णसेवा करावी लागत आहे. अलिकडे सिव्हिल हॉस्पिटलला पुरविण्यात आलेल्या कीटमुळे कर्मचाऱयांची अवस्था काय होते? हे दर्शविणारे दोन व्हिडीओ सध्या व्हायरल झाले आहेत.
पूर्वी कर्मचाऱयांना एक कीट पुरविले जात होते. तो इतका त्रासदायक नव्हता. मात्र गेल्या आठ ते दहा दिवसांत जे कीट आले आहेत ते परिधान केल्यानंतर कर्मचाऱयांना काम करणे कठीण जात आहे. कारण एक दोन तासांतच संपूर्ण शरीर घामाघुम होत आहे. त्यामुळे मुक्तपणे काम करणे कठीण जात आहे.
यासंबंधी सोशल मीडीयावर दोन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये घामाघुम झालेला कर्मचारी पीपीई कीट काढल्यानंतर त्याची अवस्था काय झाली आहे हे स्पष्टपणे दिसते. दोन मिनीटे 44 सेकेंदच्या चित्रफीतीत सिव्हिलमधील कर्मचारी पूर्णपणे घामाने चपचपल्याचे दिसून येते.
परिस्थिती काय आहे? हे दर्शविण्यासाठी पीपीई कीटच्या आत परिधान केलेले कपडे काढुन पिळून काढतानाचेही दृष्ये यामध्ये आहेत. चांगल्या दर्जाचे कीट द्या, काम करतो. नाही तर असे कीट परिधान करुन काम करता येणार नाही, असे या कर्मचाऱयाने स्पष्टपणे सांगितले आहे. दोन चित्रफीत पाहिले असता निकृष्ट दर्जाच्या कीटमुळे कर्मचाऱयांना कसा त्रास सहन करावा लागतो आहे? हे स्पष्ट होत आहे.
एकीकडे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये व्यवस्थीतपणे रुग्णांची सेवा केली जात नाही, असा आरोप सुरु आहेत. मात्र कर्मचाऱयांच्या अडचणी कोणीच लक्षात घेत नाहीत. बिम्स्च्या वरि÷ांना कर्मचाऱयांनी या संबंधी सांगूनही त्यांना चांगले पीपीई कीट पुरविण्याचे काम अद्याप झाले नाही. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा बेळगाव दौऱयावर आले होते. त्यावेळी पत्रकारांनी ही गोष्ट उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांच्या निदर्शनास आणून दिली. यासंबंधी अधिकाऱयांना सक्त सूचना दिल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले होते.
दुसरा चित्रफीत 1 मिनीटे 6 सेकंदचा आहे. या चित्रफीतीत सिव्हिल हॉस्पिटलमधील कर्मचाऱयांने पीपीई कीट परिधान केल्यानंतर काय अवस्था होते, याची माहिती दिली आहे. बिम्स्चे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप्प यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध झाले नाहीत. सरकारकडून जसे कीट पुरविले जात आहेत तेच कर्मचाऱयांना वितरीत केले जातात. सरकारने त्वरीत उत्तम दर्जाचे कीट पुरविण्याची मागणी केली जात आहे.