प्रतिनिधी/ बेळगाव
निडगुंदी (ता. रायबाग) येथील एका महिलेवर बलात्काराची घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी ही घटना घडली असून यासंबंधी रात्री रायबाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच गावातील रायप्पा याच्यावर भा.दं.वि. 376, 376(एफ) कलमांन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. रायबाग पोलीस पुढील तपास करीत आहेत.
22 वर्षीय महिला घरी एकटीच असताना त्याच गावातील एका तरुणाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे सांगण्यात आले. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून पोलीस संबंधित तरुणाचा शोध घेत आहेत.