वर्धा \ ऑनलाईन टीम
देशाक कोरोनाने थैमान घातले असताना त्यात म्युकरमायकोसिसची भर पडली आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. या आजारावरील औषधं उपलब्ध होत असल्यानं समस्या वाढत आहेत. या परिस्थितीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या प्रयत्नानं वर्ध्यात म्युकर मायकोसिसवरील इंजेक्शनची निर्मिती सुरू झाली आहे. वर्ध्यातल्या जेनेटेक लाईफ सायन्सेसनं Amphotericin B Emulsion इंजेक्शनचं उत्पादन केलं आहे.
सध्या देशात ब्लॅक फंगसवरील इंजेक्शनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. Amphotericin B Emulsion या इंजेक्शनचे उत्पादन आतापर्यंत देशात एकाच कंपनीकडून केलं जायचं. त्यामुळे बाजारात या इंजेक्शनची किंमत ही 7000 रुपये इतकी आहे. पण आता वर्ध्यात याचं उत्पादन सुरु झालं असून हे महागडं इंजेक्शन केवळ 1200 रुपयांना उपलब्ध होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाकडून जेनेटेक लाईफ सायन्सेसकडून तयार करण्यात आलेल्या इंजेक्शनची निर्मितीची माहिती देण्यात आली आहे.
कोरोना काळात म्युकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस या आजाराचेही रुग्ण मोठ्या संख्येने आढळत आहेत. या जीवघेण्या आजारावर प्रभावी म्हणून अम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनचा वापर केला जातो. या इंजेक्शनची गरज बघता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने जेनेटिक लाईफ सायन्सेसने हे एम्फोटेरिसीन बी इंजेक्शन बनविण्यासाठी पाऊल उचलले. यामुळे वैद्यकीय क्षेत्रासोबतच सामान्य नागरिकांनाही याचा दिलासा मिळणार आहे.