पाटणा / वृत्तसंस्था
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हेलिकॉप्टरचे शुक्रवारी इमर्जन्सी लॅण्डिंग करण्यात आले आहे. दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नितीशकुमार गया येथे गेले असता खराब हवामानामुळे त्यांना तातडीने हेलिपॅडवर उतरवण्यात आले. गया भागात पावसाळी हंगामात कमी पाऊस झाल्यामुळे येथे दुष्काळाची स्थिती आहे. या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी गेले असताना खराब हवामानाचा फटका त्यांना बसला. त्यानंतर ते रस्तामार्गाने गया येथून पाटण्याच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून जारी करण्यात आली. हवामान खात्याच्या माहितीनुसार ऑगस्ट महिन्यात बिहारमध्ये 64 टक्के कमी पावसाची नोंद झाली आहे.