ऑनलाईन टीम / पाटणा :
बिहारमध्ये NDA च्या सरकारचा शपथविधी उद्या (सोमवारी) दुपारी 4.30 वाजता होणार आहे. नितीशकुमार हेच पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार असून, उपमुख्यमंत्रीपदाबाबत सस्पेन्स कायम आहे. उद्याच चर्चा करून उपमुख्यमंत्री ठरवण्यात येणार असल्याचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे.
NDA च्या विधिमंडळाचे नेते म्हणून निवडून आल्यानंतर नितीशकुमार यांनी मुख्यमंत्री न होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, भाजपच्या आग्रहाखातर त्यांनी हे पद स्वीकारले आहे. त्यानंतर त्यांनी राजभवनात सरकार स्थापनेचा दावाही केला आहे. राज्यपालांनीही त्यांना सरकार स्थापन करण्याचे आमंत्रण दिले आहे.
जनता दल युनायटेडचे अध्यक्ष असलेले नितीशकुमार आता चौथ्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत.