तरुणाला अटक : पाटणामधील घटना
पाटणा / वृत्तसंस्था
बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची घटना रविवारी घडली. पाटणा येथील बख्तियारपूर भागात हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी हल्लेखोराला अटक करण्यात आली आहे. बिहार पोलिसांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार हल्ला करणारा व्यक्ती हा मानसिक रुग्ण असल्याचा संशय आहे. संबंधित हल्लेखोराची पोलिसांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे. या मारहाण प्रकरणाच्या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
पाटणामधील बख्तयारपूरमध्ये नितीशकुमार यांच्यावर एका युकवाने हल्ला केला. एका मूर्तीला हार अर्पण करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर मागील बाजूने आलेल्या तरुणाने त्यांच्यावर थप्पड मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुरक्षारक्षकांनी त्याला वेळीच रोखल्याने हल्ल्याचा प्रयत्न असफल ठरला. नितीश कुमार मूर्तीला हार अर्पण करत असतानाच सुरक्षा रक्षकांसारखेच कपडे परिधान केलेला युवक त्यांच्यापर्यंत पोहोचला. त्याने नितीशकुमार यांच्यावर हातही उगारला. मात्र, तेथे उपस्थित सुरक्षा रक्षकांनी त्याला रोखत ताब्यात घेतले. या सर्व प्रकारामुळे कार्यक्रमस्थळी काही वेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.