मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज नितीश राणाला मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएल साखळी सामन्यात आगळीक केल्याबद्दल 10 टक्के मानधन कपातीचा दंड ठोठावण्यात आला असून मुंबईचा आघाडीचा गोलंदाज जसप्रित बुमराहला देखील समज देण्यात आली आहे. बुधवारी झालेल्या उभय संघातील लढतीत केकेआरने विजय मिळवला होता. आयपीएल कार्यकारिणीने या कारवाईची माहिती दिली. मात्र, दोन्ही खेळाडूंकडून कोणती आगळीक झाली, याचा तपशील जाहीर करण्यात आला नाही.
Next Article युद्धाचा भडका
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.