वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इस्तंबुलमध्ये सुरू असलेल्या आयबीए महिलांच्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताच्या नितू आणि मनिषा यांनी विविध वजनगटातून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
शनिवारी या स्पर्धेत महिलांच्या 48 किलो वजनगटात नितूने स्पेनच्या मार्टा अरबॉलचा 5-0 अशा गुणांनी एकतर्फी पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले. महिलांच्या 57 किलो वजनगटात भारताच्या मनिषाने बल्गेरियाच्या स्वेतलाना स्टेनिव्हाचा 4-1 असा पराभव करत फिदरवेट गटात उपांत्यपूर्व गाठली आहे. हरियाणाच्या 21 वर्षीय नितूचा पुढील फेरीतील सामना कझाकस्तानच्या अलूयाशी होणार आहे.