दावणगिरीतील शरीरसौष्ठव स्पर्धेला उत्तम प्रतिसाद, विकास सूर्यवंशी उपजेता, उमेश गंगणे उत्कृष्ट पोझर
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
दावणगिरी येथे कर्नाटक शरीरसौष्ठव संघटना व दावणगिरी शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मि. कर्नाटक श्री राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेंत उडुपीच्या नित्यानंद कोटियनने मि. कर्नाटक श्री हा मानाचा किताब पटकाविला तर बेळगावच्या विकास सूर्यवंशीला उपविजेतेपदपदावर समाधान मानावे लागले. बेळगावचा उमेश गंगणे उत्कृष्ट पोझर किताबाचा मानकरी ठरला. दावणगिरी येथे झालेली शरीरसौष्ठव स्पर्धा आयबीबीएफ नियमानुसार घेण्यात आली.
निकाल पुढीलप्रमाणे.
55 किलो वजन गट- 1) बसवाणी गुरव (बेळगाव), 2) अबीब किल्लेदार (बेळगाव), 3) आकाश निराणी (बेळगाव), 4) संदेश (बेंगळूर), 5) राजकुमार दोरगुडे (बेळगाव). 60 किलो गट- 1) उमेश गंगणे (बेळगाव), 2) आकाश आर. (शिमोगा), 3) अविनाश मंतूर (धारवाड), 4) अभिलाष (उडुपी), 5) मंजुनाथ (दावणगिरी). 65 किलो गट- 1) अरूण कुमार (बेंगळूर, 2) राकेश कांबळे (बेळगाव), 3) सोमशेखर कारबी (उडुपी), 4) मेहबूब बाशा (बेळ्ळारी), 5) नाबेश (बेंगळूर). 70 किलो गट- 1) प्रताप कालकुंद्रीकर (बेळगाव), 2) श्रवण (बेंगळूर), 3) शैलेशकुमार (मंगळूर), 4) पवन बी. (दावणगिरी), 5) समीर पठाण (धारवाड). 75 किलो गट- 1) तापश कुमार नायक (चित्रदुर्ग) 2) चेतन कोटियन (उडुपी), 3) राम बेळगावकर (बेळगाव), 4) यशवंत एच.एम. (दावणगिरी), 5) शशीधर पी.एस. (बेंगळूर).
80 किलो गट- 1) राम एस (बेंगळूर) 2) अरूणकुमार जी.व्ही.के. (दावणगिरी), 3) प्रशांत एस. (शिमोगा), 4) गजानन काकतीकर (बेळगाव), 5) अफरोज ताशिलदार (बेळगाव). 85 किलो गट- 1) नित्यानंद कोटीयान (उडपी), 2- रूबेल (बेंगळूर). 85 किलोवरील गट- 1) विकास सूर्यवंशी (बेळगाव), 2) मोहमद साहिल (शिमोगा).
मि. कर्नाटक श्री या किताबासाठी बसवाणी गुरव, उमेश गंगणे, अरूणकुमार, प्रताप कालकुंद्रीकर, तापश कुमार नायक, रामा एस., नित्यानंद कोटियन, विकास सूर्यवंशी यांच्यात लढत झाली. यामध्ये नित्यानंद कोटियनने आपल्या पिळदार शरीराच्या जोरावर मि. कर्नाटक श्री मानाचा किताब पटकाविला. विकास सूर्यवंशीला उपपविजेतेपद व रमेश गंगणेने उत्कृष्ट पोझरचा किताब पटकाविला.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून अजित सिद्दण्णावर, जे.डी. भट्ट, उमा महेश, जे. निळकंठ, गंगाधर, अनिल राऊत, अनंत लंगरकांडे, हेमंत हावळ यांनी काम पाहिले.