गावातील स्ट्रीट लाईटची बिले न भरण्याचा सरपंच संघटनेचा इशारा : डाटा एंट्री ऑपरेटर्स अंतर्गत शासनाला ‘डीडी’द्वारे रक्कम नाही!
सोमवारी जि. प. अध्यक्षा, मुख्य कार्यकारी अधिकाऱयांची भेट घेणार!
प्रतिनिधी / कणकवली:
15 व्या वित्त आयोग अंतर्गत काम पूर्ण झाल्यावर संबधित ठेकेदाराचे ई पेमेंट करायचे असल्याने बरीचशी कामे पूर्ण करूनही याचे पेमेंट अजूनपर्यंत झालेले नाही. यामुळे ई पेमेंट करताना अडचणी येत असल्याबाबत तालुका सरपंच संघटनेची शुक्रवारी पुन्हा बैठक झाली. यावेळी गावातील स्ट्रीटलाईटची दोन वर्षांची थकीत बिले भरणार नाही, असा इशारा सर्वानुमते देण्यात आला आहे. तसेच डाटा एंट्री ऑपरेटर्स अंतर्गत शासनाला ‘डीडी’द्वारे रक्कम देणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, सोमवार 5 जुलै रोजी जिल्हा सरपंच संघटनेचे पदाधिकारी आरोस येथे जि. प. अध्यक्षा संजना सावंत व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
पंचायत समितीच्या प. पू. भालचंद्र महाराज सभागृहात याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी सभापती मनोज रावराणे, उपसभापती प्रकाश पारकर, माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोटय़ा सावंत, पं. स. सदस्य मिलिंद मेस्त्राr, संदीप मेस्त्राr, संघटनेचे पदाधिकारी हेमंत परुळेकर, पंढरी वायंगणकर, सुहास राणे, संतोष राणे, संतोष आग्रे, प्रभाकर बांदल, सुनींद्र सावंत, गुरुदास चव्हाण, बापू फाटक, मंगेश तळगावकर, संजय सावंत, श्री. गुरव, साक्षी परब, रिना राणे, मनाली गुरव, नीता तेली, सुजाता जाधव, श्री. मुंज आदी तालुक्यातील सरपंच पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी कोरोनामुळे निधन झालेल्या भरणी सरपंचांच्या पतीकडे सरपंच संघटनेकडून आर्थिक मदत देण्यात आली. करुळ ग्रामसेवक कै. बर्वे व कोरोनाकाळात काही उपसरपंच तसेच पदाधिकारी यांचे निधन झाले होते, या सर्वांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्ट्रीटलाईटची वीजबिले 15 व्या वित्त आयोगातून भरा, असा आदेश शासनाच्यावतीने देण्यात आला आहे. परंतु, प्रत्यक्ष निधी आला 5 लाख तर दोन वर्षांचे थकीत बिले 8 लाख मग यात विकासकामे कोणती करायची? असा सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला.