प्रतिनिधी/ निपाणी
येथील मध्यवर्ती शिवाजी चौकात शिवसेना आणि निपाणी येथील शिवप्रेमीच्या संयुक्त विद्यमाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स पाळून साधेपणाने शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला. यावेळी बेळगाव जिल्हा शिवसेना प्रमुख बाबासाहेब खा?बे, नगरपालिका आयुक्त महावीर बोरण्णावर यांच्या हस्ते शिव पुतळय़ास अभिषेक घालून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
बाबासाहेब खांबे यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वच समाजाचे आराध्य दैवत आहेत. त्यांनी हिंदवी स्वराज्यासाठी दिलेले योगदान महत्वाचे आहे. सध्याच्या युवकांनी छत्रपती शिवाजीमहाराजांचा आदर्श डोळय़ासमोर ठेवून समाजात वाटचाल करण्याचे आवाहन केले. आयुक्त महावीर बोरण्णावर यांनीही मनोगत व्यक्त केले. दिवसभरात नागरिकांनी प्रत्यक्ष पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून तसेच सोशल मीडियावर शिवप्रेमीनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले.
कार्यक्रमास नगरसेवक संजय पावले, एम.बी. जाधव, रमेश निकम, सुनील शेलार, डॉ. बळीराम जाधव, बाळासाहेब कळसकर, किरण पावले, पप्पू सूर्यवंशी, पिंटू सूर्यवंशी, केतन बोरगावे, सुरज पोटले, विजय कळसकर, बाळासाहेब वास्कर, निलेश पावले, शितल बुडके, चेतन चव्हाण, राहुल दळवी, शैलेश चव्हाण, अविनाश शिंदे, प्रल्हाद शेळके, नंदकुमार कांबळे, रामा लाड, धर्मा यादव, लक्ष्मण शिंत्रे, पालिका अभियंते विवेक जोशी, बाबासाहेब सुतार, विशाल मधळे, नितीन चिंचणकर, भुजंगा क्षीरसागर यांच्यासह शिवप्रेमी उपस्थित होते.