गणेशोत्सव मंडळांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
निपाणी तालुक्मयामध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मोठय़ा उत्साहात दरवषी साजरा केला जातो. मात्र कोरोनामुळे मागील वषी सार्वजनिक उत्सवावर निर्बंध घालण्यात आले होते. याचबरोबर यावषीही निर्बंध घालण्यात आले आहेत. मात्र कोरोना रुग्णांची संख्या घटत आहे. तेव्हा आम्हाला सार्वजनिक गणेशोत्सव दरवषी प्रमाणेच साजरा करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी निपाणी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
गणेशोत्सव हा हिंदूंचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जातो. मोठय़ा भक्तीभावाने आणि उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो. कोरोनामुळे सणांवर निर्बंध घालण्यात येत आहेत. गणेशोत्सव काळात तर अधिक कठोर नियमांची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले जातात. मात्र यावेळी कोरोना रुग्णसंख्या कमी आहे. त्यामुळे हा उत्सव साजरा करण्यास मुभा द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी निपाणी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.