प्रतिनिधी / बेळगाव
विनोद आणि कोमल पिंजानी यांनी नव्याने सुरू केलेल्या निप्पॉन पेंट्स दालनाचा उद्घाटन समारंभ गुरुवारी थाटात पार पडला. महात्मा फुले रोड येथील शोरूममध्ये हा कार्यक्रम झाला. निप्पॉन पेंट्सचे अध्यक्ष महेश आनंद यांच्या हस्ते फीत कापून या कार्यक्रमाला प्रारंभ झाला. ढोल-ताशांच्या गजरात हा सोहळा झाला.
या प्रसंगी सेल्स मॅनेजर अंकुर भारद्वाज, मार्केटिंग डायरेक्टर मार्क टिटूस, विनोद व कोमल पिंजानी यांच्या उपस्थितीत बेळगावमध्ये प्रथम निप्पॉन पेंट्स दालन सुरू झाले आहे. त्यामुळे बेळगावकरांसाठी एकाच छताखाली घरासंबंधी लागणारे वेगवेगळे रंग (कलर) उपलब्ध होणार आहेत. रंगाचा पोत, दर्जा, टिकाऊपणा व सुरक्षितता याबाबत निप्पॉन कोणतीही तडजोड करत नाही, असे यावेळी सांगण्यात आले. याप्रसंगी घरांसंबंधी रंगांबरोबर सजावटीचे साहित्यदेखील उपलब्ध होणार आहे. यावेळी जनरल मॅनेजर विनय भास्कर, मॅनेजर हरिश कुंभार यासह नागरिक उपस्थित होते.