वार्ताहर / औंध
खटाव तालुक्यातील दुष्काळी असलेल्या निमसोड येथील द्राक्षाची गोडी सातासमुद्रापलीकडे लागली आहे. आतापर्यंत अंदाजे 300 टन द्राक्षे आतापर्यंत एक्सपोर्ट करण्यात आली आहेत.
निमसोड येथील रामकृष्णवरुडे,सुनिल मोरे, राजेंद्र वरुडे,चेतन वरुडे,शुभम वरुडे दिपक गायकवाड यांनी ग्रोप्लस एक्सपोर्ट कंपनी स्थापन करून मंडल क्रुषी अधिकारी दिलीप दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली द्राक्षे एक्सपोर्ट करण्याचा निर्णय घेतला.
दुष्काळी भाग असूनही येथील द्राक्षाचा दर्जा आणि गुणवत्ता अतिशय चांगली आहे. विदेशातील लोकांना याची गोडी लागल्याने येथील मालाला विदेशी बाजारपेठेत देखील चांगली मागणी आहे. निमसोड येथील 300 मेट्रिक टन द्राक्षे अमेरिका, नेदरलॅंड, जर्मनी युरोप देशात निर्यात करण्यात आली आहेत. विदेशात द्राक्षे निर्यात करताना दिलीप दाभाडे रामकृष्ण वरुडे,सुनिल मोरे, राजेंद्र वरुडे,चेतन वरुडे,शुभम वरुडे दिपक गायकवाड आदी.