प्रतिनिधी /वडूज
निमसोड (ता.खटाव) येथे प्रगती महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उदघाटन नुकतेच मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी युवा नेते रविंद्र खाडे, उज्वलदीप देशमुख,गोरे साहेब,पाटील साहेब (पंचायत समिति खटाव तालुका)पूजा देशमुख मॅडम,सिआरपी निता देशमुख मॅडम, जगन्नाथ खाडे उपस्थित होते. या ग्रामसंघाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक सामाजिक जीवनमान उंचवण्यास मदत होणार आहे .बचतगटाच्या माध्यमातून महिलांना नवीन रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत .ग्रामसंघाच्या माध्यमातून अति तातडीच्या आर्थिक गरजा गावातच पूर्ण होणार आहेत. याचबरोबर महिलांचे सामाजिक प्रश्न व महिला विकासाचे काम यापुढे ग्रामसंघाच्या माध्यमातून होणार आहे. आता ग्रामविकासाच्या योजनाही बचतगटाच्या माध्यमातून राबविल्या जाणार आहेत व महिलांचे सक्ष्मीकरण होणार आहे.