ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ आज सकाळी पाकिस्तानी लढाऊ विमान घिरट्या घालत असल्याचे सुरक्षा दलाच्या निदर्शनास आले. त्यामुळे सुरक्षा दले सतर्क झाली आहेत. टेहाळणीच्या उद्देशाने हे विमान घिरट्या घालत असल्याचे सांगण्यात येते.
मागील आठवड्यातही नियंत्रण रेषेवर एक ड्रोनसदृश्य वस्तू आढळली होती. सुरक्षा दलांच्या सतर्कतेनंतर ती माघारी परतली. यापूर्वीही पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय सीमेवरील सांबा सेक्टरमध्ये दहशतवाद्यांसाठी ड्रोनमधून शस्त्रास्त्रे पाठवण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे.
बैनगलाडच्या चक फकिरा भागातही शस्त्रातस्करीशी संबंधित पाकिस्तानी ड्रोन दिसली होती. सांबाच्या बनाई नाल्याजवळही हे ड्रोन दोनवेळा दिसले.