ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांचे बळ वाढवण्यासाठी सरकारने जवानांना आधुनिक आणि घातक अशा अमेरिकन सिग सॉअर असॉल्ट रायफल्स देण्याचा निर्णय घेतला आहे.
सॉअर असॉल्ट रायफल्ससाठी भारताने अमेरिकेसोबत करार केला आहे. फास्ट ट्रॅक खरेदी कार्यक्रमांतर्गत भारताने या रायफल्स खरेदी केल्या होत्या. त्यामधील 72 हजार रायफल्स भारतात आल्या असून, त्या लष्कराच्या वापरासाठी उत्तर कमांड आणि अन्य ठिकाणी त्या रवाना करण्यात आल्या आहेत.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात असलेल्या जवानांसाठी 1.50 लाख सिग सॉअर असॉल्ट रायफल्सचा वापर करण्यात येईल. इतर सुरक्षा दलांना एके-207 रायफल्स देण्यात येतील. पूर्व लडाखमधील सीमारेषेवरून मागील पाच महिन्यांपासून भारत-चीनमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांचे जवान एकमेकांसमोर उभे ठाकले असून, दोन्ही देशांनी युद्धसज्जता ठेवली आहे.