प्रतिनिधी/ सातारा
विसावा नाका येथील पामेसा इंटरनॅशनल मार्केटिंग कंपनीच्या कर्मचाऱयांनी कोरोना बाबतच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी शनिवारी तब्बल 24 हजार 400 रूपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे. शनिवारी कंपनीचे 107 कामगार विनामास्क व सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन केले होते. याची माहिती मिळताच सातारा सिटी पोलीस त्वरीत येथील पहाणी केली.
या ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाल्याचे निदर्शनास आले. सध्या कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे कोरोनाबाबतच्या सर्व नियमांचे काटेकोर पणे पालन करण्याच्या सुचना प्रशासनातर्फे वेळोवेळी देण्यात येत असतात. त्यातच आता सुशिक्षित नागरिकांतर्फे अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचे पाहुन पोलीस विभागातर्फे ही आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.
सध्या शासनाने एकाच ठिकाणी गर्दी करू नये. तसेस एखाद्या कार्यक्रमाला 50 नागरिकांना परवाणगी देण्यात आली आहे. पण पामेसा इंटरनॅशनल मार्केटींग कंपनीतर्फे आपल्या सातारा कार्यालयात एकाच ठिकाणी तब्बल 107 कामगारांना निमंत्रित केले होते. येथील सभागृह ही अत्यंत लहान असल्याने एकाच ठिकाणी मोठय़ा प्रमाणात कर्मचाऱयांची गर्दी झालेली होती.
याची माहिती मिळताच पोलिस विभागातर्फे येथे कारवाई करून दंड ठोठाविण्यात आला. याप्रसंगी सातारा सिटी पोलीस विभागातील राहूल खाडेसाहेब, कर्णे आणि नगरपरिषदेचे प्रशांत निकम व प्रणव पवार यांनी संयुक्तरित्या ही कारवाई केली.