प्रतिनिधी / पेडणे
जादा खडी भरून वाहतूक नियमांचे उल्लंघन करत वाहतूक करणारा एम.एच 07 – सी. 6971 या क्रमांकाचा ट्रक पेडणे ट्रक मालक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी रोखला व त्याला पेडणे पेडणे पोलिसांच्या ताब्यात दिला. या ट्रकातून मोपा विमानतळ प्रकल्पासाठी खडीची वाहतूक केली जात होती. मोपा विमानतळ प्रकल्पावर एका ट्रकमधून केवळ दोन ब्रास मालाची वाहतूक करण्याचा नियम आहे. असे असताना बाहेरच्या गाडय़ांना वेगळ नियम कसा काय लागू होतो. जर एखादा ट्रक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून क्षमतेपेक्षा माल भरून विमानतळ प्रकल्पावर नेत असेल, तर त्या गाडय़ा अडवून, पोलिसांच्या ताब्यात द्या पेंवा तत्सम सरकारी यंत्रणेकडे द्या, यासाठी आपला पाठिंबा असेल, असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सांगितले होते. त्यानुसार नियमांचे उल्लंघन करत दोन ब्रास पेक्षा अधिक खडी भरून वाहतूक करणार ट्रक गुरुवारी पेडणे ट्रक मालक संघटनेच्या पदाधिकाऱयांनी रोखून पेडणे पोलिसांच्या ताब्यात दिला.