प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील विविध आरोग्य केंद्रात कोरोना लस देण्यात येत आहे. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालल्याने नागरिकांमध्ये भीती वाढली आहे. त्यामुळे काही नागरिकांनी आता कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी धावपळ चालविली आहे. सोमवारी वडगाव येथील नगर आरोग्य केंद्रात लस घेण्याकरिता नागरिकांची गर्दी झाली होती. त्यामुळे आरोग्य केंद्रातच सर्व नियम पायदळी तुडविण्यात आल्याने दिसून आले.
कोरोना विषाणूंचा विस्फोट झाल्याने दररोज हजारो रुग्णांना कोरोनाची बाधा होत आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ झाला आहे. शासनाच्यावतीने विविध आरोग्य केंद्रात ही लस मोफत देण्यात येत आहे. सध्या 45 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. दि. 1 मेपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येणार असून याकरिता नोंदणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सध्या कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना लस घेण्याकडे धाव घेतली आहे. त्यामुळे लस देण्यात येणाऱया प्राथमिक आरोग्य केंद्रांवर गर्दी होत आहे. या ठिकाणी प्रथम लसीकरणासाठी टोकन देण्यात येते. पण टोकन देण्यासाठी कर्मचारी नसल्याने अडचण निर्माण होत आहे.
सोमवारी सकाळी वडगाव नगर आरोग्य केंद्रावर नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली होती. या ठिकाणी गर्दी होऊ नये याकरिता मार्किंग करण्यात आले आहे. पण सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष करून नागरिकांनी आरोग्य केंद्रात एकच गर्दी केली होती. त्यामुळे कोरोनाची भीती असताना नियमावलीचे पालन करण्याकडे दुर्लक्ष का? असा मुद्दा उपस्थित होत आहे. त्यामुळे नगर आरोग्य केंद्रात आवश्यक उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. या ठिकाणी कोरोनाची चाचणी करण्यासाठी तसेच कोरोना लस घेण्यासाठी नागरिक येत आहेत. पण लसीकरणासाठी टोकन देण्यात येत आहे. मात्र, सदर टोकन देण्यासाठी तसेच या ठिकाणी होणाऱया गर्दीवर नियंत्रणासाठी कोणीच वाली नाही. या केंद्रात प्रमुख नसल्याने गर्दीला आळा कोण घालणार, असा मुद्दा उपस्थित झाला आहे. वास्तविक पाहता, कोरोना चाचणी करण्यासाठी येणाऱया नागरिकांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण असल्यास या ठिकाणी गर्दी करणाऱया नागरिकांनाही कोरोनाची लागण होण्याची शक्मयता आहे. पण सामाजिक अंतर राखण्याकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना धोका वाढला आहे. त्यामुळे आवश्यक उपाययोजना राबविण्यात याव्यात, अशी मागणी होत आहे.