महसूल, पोलीस विभागाची कारवाई : 381 जणांकडून 76 हजार रुपये दंड वसूल
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
कोरोना रोखण्यासाठी जाहीर केलेल्या कोविडच्या नियमांची अंमलबजावणी न करणाऱयांविरोधात कारवाईची धडक मोहीम जिल्हय़ात सुरू केली असून पोलीस, महसूल अधिकारी व पंचायत समिती अधिकाऱयांमार्फत विविध ठिकाणी तपासणी सुरू करण्यात आली आहे. मास्क न वापरणाऱया 381 जणांवर 76 हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हय़ात कोविडच्या नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हय़ात विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. जिल्हय़ात दिवसभरात 381 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्यामुळे दंडात्मक कारवाई करण्यात आली.
यामध्ये महसूल विभागाने मंगळवारी एका दिवसात 26 व्यक्तींवर कारवाई करत एकूण पाच हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. तर पोलिसांनी 181 व्यक्तींवर कारवाई करत एकूण 36 हजार 200 रुपयांचा दंड वसूल केला. नगरपालिका क्षेत्रात 154 व्यक्ती विनामास्क आढळल्या. त्यांच्याकडून एकूण 30 हजार 800 रुपये दंड वसूल करण्यात आला. तर जिल्हय़ाच्या ग्रामीण भागात 20 व्यक्तींवर मास्क वापरत नसल्याप्रकरणी कारवाई करून त्यांच्याकडून चार हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. मांगळवारी दिवसभरात वसूल करण्यात आलेल्या एकूण दंडाची रक्कम 76 हजार 200 रुपये इतकी आहे.
त्याशिवाय जिल्हय़ातील महसूल, पोलीस आणि नगरपालिका प्रशासनाकडून मंगल कार्यालये, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळे, समारंभ, हॉटेल्स या ठिकाणी तालुक्मयातील पथकामार्फत तपासणी करण्यात येत आहे. कोविडचे नियम न पाळणाऱयांविरोधात कारवाई सुरू केली आहे. आतापर्यंत एकूण 96 ठिकाणांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये दोन ठिकाणी कोविडच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे दिसून आले. त्यानुसार कारवाई सुरू आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता नागरिकांनी कोविडच्या नियमांचे पालन करावे. तसेच मास्क, हॅन्ड सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतराचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केले आहे.