शिवाजी विद्यापीठाची डी. लिट. पदवी स्विकारल्यानंतर भारतरत्न लता मंगेशकर यांनी भावना व्यक्त केल्या
कोल्हापूर प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्थेकडून डी. लिट. पदवी सन्मानदर्शक स्विकारताना आईच्या कुशीतील निरागस बालकाचा आनंद आपल्या मनी दाटत आहे, अशी भावना भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी व्यक्त केली. गानसम्राज्ञी ’भारतरत्न’ लता मंगेशकर यांना शिवाजी विद्यापीठाने 21 नोव्हेंबर 1978 साली डी. लिट. ही सर्वोच्च सन्मानदर्शक पदवी प्रदान करून गौरविले आहे. याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना लता मंगेशकर बोलत होत्या.
भारतातच काय, पण जगभर जिच्या सुरांचे साम्राज्य पसरले आहे, त्या ह्या अलौकिक गायिकेला- लता मंगेशकर यांना शिवाजी विद्यापीठाच्या विधिसभेने व कार्यकारिणीने एकमुखाने ठराव करून ’डॉक्टर ऑफ लेटर्स’ ही सन्मानदर्शक पदवी प्रदान करावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. शिवाजी विद्यापीठाने त्यांनी संगीत व नाटय़शास्त्र विद्यापीठात स्थापन करावे, अशी भावना व्यक्त केली होती. ती इच्छा विद्यापीठाने पूर्ण केली आहे. आता विद्यापीठाच्या संगीतशास्त्र विभागातूक अनेक विद्यार्थी शिक्षण घेवून बाहेर पडले आहेत.
रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारा स्वर निमाला
गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनामुळे विसाव्या शतकावर आणि रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा स्वर कायमचा निमाला आहे. लता मंगेशकर यांचे कोल्हापूरशी आणि शिवाजी विद्यापीठाशी स्नेहाचे नाते होते. 21 नोव्हेंबर 1978 रोजी शिवाजी विद्यापीठाने त्यांना सर्वोच्च डी.लिट. ही मानद पदवी तत्कालीन कुलगुरू डॉ. बी.एस. भणगे यांच्या हस्ते प्रदान करून त्यांच्या कार्याचा कृतज्ञ गौरव केला होता. लता मंगेशकर यांच्या स्वरांनी गत शतकभरात भारतातीलच नव्हे, तर जगभरातल्या संगीतरसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. येथून पुढेही पिढय़ान् पिढय़ांवर त्यांच्या आवाजाची मोहिनी कायम राहणार आहे. संगीताच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांची संपूर्ण कारकीर्द म्हणजे एक कार्यशाळाच होती.
कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के (शिवाजी विद्यापीठ )