प्रतिष्ठितांनी केले की ’हनीट्रप’: सामान्य घावला की नावासह तुकडा
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयातील एका डॉक्टरला रेकॉर्ड केलेले व्हिडिओ कॉलिंग व्हायरल करण्याची धमकी देत त्याला 60 लाख रुपयांची खंडणी मागणाऱया तीन महिलांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केल्यानंतर एकच खळबळ उडालीय. यापूर्वी देखील हनीट्रपच्या घटना घडल्या आहेत त्यातील तक्रारदाराची नावे पोलिसांनी दिली. मात्र या गुन्हय़ातील निरागस, प्रतिष्ठिताचे नाव माध्यमांना देण्यात आले. त्यातील आरोपी महिलांची नावे दिली पण ज्याला नेहमीच हनीट्रपमध्ये सापडायची सवय होती त्याचे नाव अनभिज्ञ ठेवले असले तरी शहरात याची चांगलीच चर्चा सुरु आहे.
साताऱयात यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या आहेत. कधी हिरवा शालू लाल झाला तर कधी आहे. वासनाकांडात काही वर्षांपूर्वी साताऱयाचे नाव राज्यभर गाजले होते. त्यानंतर काही हनीट्रप घडले त्यातील तक्रारदाराच्या नावासह आरोपींची नावे देखील येवून गेली. मात्र शनिवारी शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या तक्रारदाराचे नाव एक वैद्यकीय अधिकारी असे देण्यात आले होते. तक्रारदाराचे नाव उघड होवू नये म्हणून काळजी घेण्यात येत होती.
वास्तविक ज्या तक्रारदाराने 12 लाखाची खंडणी या तीन महिलांना दिली होती याचा अर्थ तो त्यांच्या जाळय़ात कृतीशील सापडला होता. जर त्यात त्याचा सहभाग नसता तर त्याने लाखो रुपये दिले नसती अशी चर्चा शहरात सुरु आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या भाषेत वैद्यकीय अधिकारी असलेल्या त्या व्यक्तीचे अनेक किस्से चर्चिले जात आहेत. अनेक नर्सना या निरागसाने त्याचे कारनामे यापूर्वी दाखवलेले आहेत. त्यामुळे त्या नर्सना हे वृत्त कळाल्यानंतर त्यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे.
वास्तविक डॉक्टर म्हणजे सगळे देवच मानतात व डॉक्टर देव असतातच. मात्र अशा अपवादात्मक घटनांमध्ये हा देव किती दानव देखील असू शकतो याची प्रचिती आलीय. व्हॉटसऍप, सोशल मिडियाचा वापर करताना भान राखले पाहिजे याचे प्रबोधन सुरु असले तरी अनेक घटना सध्या घडत आहेत. याला हनीट्रप नाव दिले त्यातील पुरुषावरील जबाबदारी संपून जाते असे सर्टिफिकेट पोलिसांनी देण्याची गरज नाही.
हा निरागस यापूर्वी देखील त्याच्याकडे कामाला असलेल्या नर्सेसबरोबर असेच वागायचा. त्यातील अनेकजणींनी असेच उगाच अब्रुचे धिंडवडे नको म्हणून दुसरीकडे कामाला गेल्या. याचा उद्योग सुरुच होता अन तो मग शेवटी या तिघींच्या सापळय़ात अडकला. या महिला देखील तेवढय़ाच धाडसी निघाल्या अन त्यांनी साताऱयाचे नाव रोशन केले. चक्क 60 लाख रुपये मागण्याचे धाडस दाखवत त्यांनी त्या डॉक्टरकडून 12 लाख रुपये वसूल देखील केले होते.
त्यानंतर देखील त्या गप्प रहात नसल्याने शेवटी मग आता आपल्यातील हा रोमँटिकपणा खूपच महाग पडतोय याची जाणीव निरागस डॉक्टरांना झाल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी तातडीने कारवाई केली त्यांचे अभिनंदनच मात्र महिला आरोपींची नावे जाहीर करताना त्यांनी किमान महिला म्हणून तरी त्यांच्याकडे सहानुभूतीने पाहण्याची गरज होती. इज्जत, इभ्रत फक्त प्रतिष्ठत असलेल्यांना आणि गरीब, सर्वसामान्यांना ती नसतेच असा नवीन पॅटर्न या प्रकरणात दिसला. त्याला कोणी हनीट्रप नाव दिले, कोणी काही म्हणत असले तरी टाळी दोन्ही हातांनी वाजलेली असते एवढे सत्य समोर असून त्याची चर्चा सध्या सातारा शहरासह वैद्यकीय क्षेत्रात देखील सुरु आहे. हनीट्रप असतातच अडकायचे की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. पोलिसांनी अशा घटनांकडे पाहताना समानतेने पहावे त्यात प्रतिष्ठीत, गरीब, सामान्य, महिला, पुरुष असा भेद करु नये घडलेली घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रबोधन करावे एवढेच.