बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर
प्रतिनिधी \ बेळगाव
मच्छे (ता. बेळगाव) येथील निराश्रीत केंद्रात आश्रय घेतलेल्या एका वृद्धाचा शुक्रवार दि. 24 रोजी पहाटे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात यासंबंधी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
बाळाप्पा अप्पय्या अमातेर (वय 60 रा. हत्तरगी) असे त्याचे नाव आहे. 27 डिसेंबर 2019 रोजी हा वृद्ध मच्छे येथील निराश्रीत केंद्रात दाखल झाला होता. गेंल्या 1 महिन्यापासून त्याची प्रकृती खालावली होती. 10 दिवसांपूर्वी त्याला उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
शुक्रवारी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास उपचाराचा उपयोग न होता या वृद्धाचा मृत्यू झाला आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहेत. संबंधितांनी 0831-2405252 या क्रमांकावर बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.