बेकायदेशीर चिरेखाणी ,जुगाराशी संबंध असल्याचा आरोप
वाळपई प्रतिनिधी
वाळपईचे पोलीस निरीक्षक सागर एकोस्कर हे भ्रष्ट आहेत .सतरी तालुक्यामध्ये अनेक अनैतिक कृत्यात ते सहभागी आहेत .होंडा पंचायतीचे माजी सरपंच तथा विद्यमान पंचायत सभासद सुरेश माडकर यांना मारहाण करून त्यांनी आपल्या उद्दामपणाचे उदाहरण दाखवून दिलेले आहे. यामुळे सरकारने त्यांच्यावर कङङ कारवाई करावी अशा प्रकारची मागणी पिसुर्ले शेतकरी संघटनेने केली आहे. या संदर्भात पत्रकार परिषद गुरुवारी संध्याकाळी वाळपईत आयोजित करण्यात आली होती.
यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी निरीक्षक सागर यांच्यावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली. सत्तरी तालुक्मयांमध्ये मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर चिरेखाणी व्यवसाय सुरू आहे. खास करून पिसुर्ले भागामध्ये मोठय़ा प्रमाणात बेकायदेशीर खाणी सुरू असताना या संदर्भात अनेक तक्रारी करून सुद्धा त्यांनी अजिबात यासंदर्भात लक्ष घातले नाही. न्यायालयाचे निर्देश असतानासुद्धा चिरेखाणीच्याविरोधात अजिबात कारवाई केलेली नाही .त्यामुळे त्यांचा यामध्ये हात आहे. त्याचप्रमाणे काही महिन्यापूर्वी पिसुर्ले भागातून खनिज मालाची वाहतूक करण्यात आली होती. सदर मार्गातून वाहतूक करणे हे बेकायदेशीर असताना या संदर्भात तक्रार दाखल करून सुद्धा अजून पर्यंत कारवाई केलेली नाही .अशा अनेक प्रकरणांमध्ये त्याचा सहभाग असून सत्तरी तालुक्यामध्ये मोठय़ा प्रमाणात जुगार बेकायदेशीर चिरेखाणी ा?चा व्यवसाय असतानासुद्धा अजून पर्यंत त्यांनी कारवाई केलेली नाही .त्यामुळे अशा अधिकाऱयावर सरकारने कठोर कारवाई करावी व त्यांना घरचा रस्ता दाखवावा अशा प्रकारची मागणी केलेली आहे. सुरेश माडकर यांच्यासारख्या लोकप्रतिनिधीवर मारहाण करून त्याने सर्व पोलीस खात्याला बदनामी करण्याचा प्रयत्न केलेला आहे . यामुळे असे अधिकारी पोलिस खात्याला एक प्रकारचा डाग असून सरकारने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत संघटनेचे उपाध्यक्ष जयेश्शर गावडे बाबुसो गावडे ,नवसो परवार व इतर यांचा समावेश होता.