गोवा फॉरवर्डची मागणी
प्रतिनिधी /पणजी
फातोर्डा पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नाईक यांची त्वरीत बदली करा अन्यथा कायदा सुव्यवस्था बिघडणार, त्याची जबाबदारी पोलीस खात्यावर असणार असे गोवा फॉरवर्डचे दुर्गादास कामत यांनी सांगितले. याबाबत निवडणूक आयोग दिल्ली येथे पत्राद्वारे कळविण्यात आल्याचे ते म्हणाले. एक लोक प्रतिनिधी सोबत सरकारी कर्मचाऱय़ांने कसे वागावे याची तमीज कपील नाईक याला नसून त्याचा परीणाम गंभीर होणार असल्याचे दुर्गादास कामत यांनी सांगितले.
येथील गोवा फॉरवर्डच्या कार्यालयात शुक्रावारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दुर्गादास कामत बोलत होते. यावेळी त्यांच्या सोबत सांत आंद्रे मतदार संघतील ब्लॉक अध्यक्ष ऍन्थोनी डिसोझा, युवा अध्यक्ष व्हिक्टर नोरोन्हा व अन्य मान्यर उपस्थित होते. फातार्डा मतदार संघातील विकास कामे अडवून ठेवली जात असल्याने त्याचा जाप विचारण्यासाठी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजाय सरकदेसाई तसेच अन्य कार्यकर्ते सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कार्यालयाच्या दिशेने जात होते. मध्येच पोलिसांनी त्यांना अडविल्याने वाहतूकीचा खोळंबा झाला होता. यावेळी निरीक्षक कपील नाईक यांनी फातोर्डाचे आमदार तसेच गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी दिलेली वागणूक निंदनीय आहे. हे प्रकरण कपील नाईक यांना शेकणार असल्याचा ईशाराही कामत यांनी दिला आहे.
निरीक्षक कपील नाईक हे अनेक प्रकरणात गुंतलेले आहेत. पोलीस स्थानकातील जुनी वाहने भंगारात विकणे, अटक पेलेल्या चोरटय़ांकडून पाच लाख रुपये घेतल्याचेही प्रकरण असून ही सगळी माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आली आहे. निरीक्षक कपील नाईक हे सध्या भाजपाचे ऐजंट बनून काम करीत असल्याचा आरोपही दुर्गादास कामत यांनी केली केले आहेत.
यावेळी दुर्गादास कामत यांनी सांत आंद्र मतदार संघात गोवा फॉरवर्डचे युवा अध्यक्ष म्हणून व्हिक्टर नोरेन्हा यांची नियुक्ती करण्यात आल्याचेही जाहिर केले,. सांतआंद्रे मतदार संघातून गोवा फॉरवर्ड तर्फे जगदीश भोबे हे निवडणूक लढविणार असून त्यांनी घरोघारी प्रचाराला सुरुवात केली आहे. भोबे यांना चांगला पाठींबा मिळत असल्याचेही दुर्गादास कामत म्हणाले.
यावेळी भाजपाला घरी बसविण्याचा सांत आंद्रे मतदार संघातील मतदारांनी विशेस्तः युवकांनी ठाम निणर्य केला आहे असे व्हिक्टर नोरोन्हा यांनी सांगितले. आम्ही जेव्हा घरोघरी मतदारांच्या भेटीसाठी जात असतो तेव्हा मतदार आम्हाला आपल्या अनेक समस्या सांगत असतात सध्या आमच्या मतदार संघात बेकारी मोठय़ाप्रमाणात वाढली असून मतदार संघातील विकास कामेही अडकून पडलेली आहेत. बेकारी हटविण्यासाठी आणि रखडून पडलेली विकासकामे पुढे नेण्यासाठी आता नव्या आमदाराची गरज असून मतदार निवडणूकीची वाट पाहत आहे असेही त्यांनी सांगितले. आपली युवा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्या बद्दल त्यांनी गोवा फॉरवर्डचे सर्वे सर्वा विजय सरदेसाई यांचे आभार मानले.