मुंबई / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालय तसेच त्यासमोरील नवीन प्रशासकीय इमारतीतील कार्यालयांचे निर्जंतुकीकरणासाठी आज आणि उद्या ( २९ आणि ३० एप्रिल) मंत्रालयातील कामकाज बंद राहणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मंगळवारी दिली.
कोरोनामुळे महामारीची परिस्थिती उदभवली आहे. त्यामुळे केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सार्वजनिक ठिकाणी तसेच कार्यालयांच्या निर्जंतुकीकरणाची प्रक्रिया स्पष्ट करण्यात आली आहे. त्यानुसार मंत्रालय आणि नवीन प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचे निर्जंतुकीकरणाचे काम २९ आणि ३० एप्रिल रोजी करण्यात येणार आहे.