हिमाचल उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या भाषेवर नाराजी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान रंजक टिप्पणी केली आहे. हे प्रकरण हिमाचल उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाशी संबंधित होते. याच्या विरोधात दाखल याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड यांनी सहकारी न्यायाधीशाला ‘निर्णयात काय लिहिले गेले आहे’ अशी विचारणा केली. यावर खंडपीठातील त्यांचे सहकारी न्यायाधीश एम.आर. शाह यांनी ‘मलाही समजले नाही, मोठमोठी वाक्ये आहेत, ठिकठिकाणी स्वल्पविराम असून याचे वाचन करताना माझे डोके दुखू लागल्याने बाम लावावा लागल्या’चे म्हटले आहे.
हा निर्णय वाचल्यावर मला माझ्या बुद्धीवर संशय होऊ लागला आहे. कारण मला यातूनच काही समजले नाही. निर्णयाची भाषा सर्वसामान्यांना सहजपणे समजू शकेल अशी असावी. निर्णय एखाद्या प्रबंधासारखा लिहू नये असे न्यायाधीश शाह यांनी म्हटले आहे.
मी सकाळी 10.10 वाजता हा निर्णय वाचण्यासाठी बसलो. 10.55 वाजेपर्यंत याचे पूर्ण वाच केले. मी आश्चर्यचकित झालो, अखेर मला सीजीआइटीच्या आदेशाला पहावे लागेल. हा प्रकार अविश्वनसीय आहे, ही न्यायाची अव्यवस्था आहे. प्रत्येक प्रकरणामध्ये अशाप्रकारचे निर्णय दिसून येतात अशी टिप्पणी न्यायाधीश चंद्रचूड यांनी केली आहे.
एका कर्मचाऱयावर भ्रष्टाचाराच्या आरोपाप्रकरणी सीजीआईटीच्या आदेशला हिमाचल उच्च न्यायालयाने मागील वर्षी 27 नोव्हेंबर रोजी योग्य ठरविले होते. उच्च न्यायालयाच्या या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करण्यात आली होती. स्वतःच्या 18 पानांच्या या दीर्घ निर्णयात उच्च न्यायालयाकडून नोंद कारणे समजण्याच्या पलिकडील आहेत. नियोजित तर्क आणि वापरण्यात आलेली भाषा अक्षम्य असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.