अचूक बातमी “तरुण भारत”ची, शुक्रवार 23 जुलै 21, सकाळी 10.45
●आठवड्याचा सरासरी पॉझिटिव्हीटी रेट घसरला ●आजच्या प्राधिकरण बैठकीकडे लक्ष ●जिल्ह्यात गत 24 तासात 843 रूग्ण वाढले ●पॉझिटिव्हीटी रेट 8.32 टक्के ●10126 संशयितांच्या चाचण्या
प्रतिनिधी / सातारा :
जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर सुरू असतानाच कोरोना रूग्णवाढीची टांगती तलवारही कायम आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनावरील दुहेरी ताण वाढला असून स्थानिक नगरपालिका, ग्रामपंंचायतींचीही धांदल उडाली आहे. अशा वातावरणातच जिल्ह्यात कोरोनाच्या आरटीपीसीरआर चाचण्यांची पॉझिटिव्हीटी कमी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निर्बंधात शिथिलता येणार का? याकडे जिल्हावासियांचे लक्ष आहे. दरम्यान शुक्रवारी आलेल्या अहवालात जिल्ह्यात गेल्या 24 तासात 10 हजार 126 चाचण्या झाल्या असून 843 रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.
गुरूवारचा अपवाद वगळता पॉझिटिव्हीटी कमी
जिल्ह्यात गुरूवारी आलेल्या अहवालात पॉझिटिव्हीटी रेट 10.18 होता. त्यामुळे थोडी चिंता वाढली होती. मात्र 16 जुलै ते 21 जुलै पर्यंत पॉझिटिव्हीटी रेट 7.41 ते 8.42 या दरम्यान राहिला आहे. 18 जुलै रोजी पॉझिटिव्हीटी रेट 5.23 पर्यंंत खाली घसरलेला होता. त्यामुळे गेल्या सात दिवसांच्या पॉझिटिव्हीटी रेटचा विचार करता एकूण पॉझिटिव्हीटी रेट हा 6.50 च्या आसपास राहिला आहे. यातच गुरूवारी दुपारी आलेल्या अहवालात जिल्ह्यात मृत्यूदरही कमी झाला असून 8 रूग्णांचे मृत्यू झाले आहेत.
निर्बंध शिथिल होण्याची शक्यता
जिल्ह्यातील आरटीपीसीआर चाचण्यांचा पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्याने जिल्ह्यातील निर्बंध आणखी शिथिल होतील अशी शक्यता आहे. यावर आज दुपारपर्यंत जिल्हा आपत्ती निवारण प्राधिकरणची बैठक होऊन परिपत्रक निघेल. जिल्ह्यात कराड वगळता इतर तालुक्यात रूग्णवाढीत घसरण झाली आहे. कराड तालुक्यात मात्र रूग्णवाढीचा वेग दोऩशेच्या पुढे कायम आहे. सातारा तालुक्यात दीडशेच्या पुढे आणि दोनशेच्या आत रूग्णवाढ कायम आहे. त्यामुळे आज निर्णय काय होतो याकडे लक्ष लागले आहे.
गुरूवारी जिल्ह्यात बाधित-843, कोरोनामुक्त – 1073, बऴी – 8
गुरूवारपर्यंत जिल्ह्यात एकूण नमूने – 13,04,551, एकूण बाधित –2,11,790, घरी सोडण्यात आलेले –1,98,805, मृत्यू -5110, उपचारार्थ रुग्ण-9967