लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज होणार मतदान : कोणत्याही आमिषाला, दबावाला बळी पडू नका : कोरोना नियमांचे पालन करा
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक शनिवार दि. 17 रोजी होत आहे. कोरोनाच्या विळख्यातच ही मतदान प्रक्रिया होणार आहे. मात्र यासाठी सर्व ती तयारी पूर्ण केली असून प्रत्येकाचे थर्मल स्क्रिनिंग करून मतदानासाठी सोडले जाणार आहे. तोंडावर मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर या सर्व नियमांचे पालन करत प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी डॉ. के. हरिषकुमार यांनी केले आहे. निर्भयपणे सर्वांनी मतदान करावे, असे त्यांनी
सांगितले.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये एकूण 18 लाख 13 हजार 567 मतदार आहेत. या निवडणुकीसाठी 2 हजार 566 मतदान केंदे तर 11 हजार 290 निवडणूक कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया अत्यंत सुरळीत आणि शांततेत पार पाडण्यासाठी सर्व ती तयारी केली असल्याची माहिती डॉ. हरिषकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
शनिवार दि. 17 रोजी सकाळी 7 पासून मतदानाला प्रारंभ होणार आहे तर सायंकाळी 7 पर्यंत मतदान प्रक्रिया चालणार आहे. या निवडणुकीसाठी एकूण 10 जण रिंगणात आहेत. ईक्हीएमच्या माध्यमातून मतदान घेतले जाणार आहे.
मतदान काळात सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी यापूर्वीच अधिकाऱयांना आणि कर्मचाऱयांना सूचना करण्यात आल्या आहेत. मतदान केंद्र परिसरात योग्यप्रकारे सुरक्षा तैनात केली जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व तयारी केली असल्याची माहिती जिल्हाधिकाऱयांनी दिली आहे.
मतदानासाठी चालणारी कागदपत्रे
मतदान करण्यासाठी केंद्रांवर ओळखपत्र असणे गरजेचे आहे. यासाठी मतदान कार्ड, आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, रोजगारहमी ओळखपत्र, बँक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक, वाहन चालक परवाना, स्मार्टकार्ड वितरण, पेन्शन ओळखपत्र, खासदार, विधानसभा आणि विधानपरिषद सदस्यांकडून देण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, केंद्र, राज्य सरकार किंवा खासगी कंपनीकडून प्राप्त झालेले नोकरीचे ओळखपत्रसुद्धा या मतदानासाठी चालणार आहेत.
एकूण विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार
मतदारसंघ | पुरुष मतदार | महिला मतदार | इतर मतदार | एकूण मतदार |
अरभावी | 1,20,503 | 1,19,500 | 9 | 2,40,012 |
गोकाक | 1,23,538 | 1,26,446 | 14 | 2,49,998 |
बेळगाव उत्तर | 1,20,502 | 1,22,105 | 11 | 2,42,618 |
बेळगाव दक्षिण | 1,22,705 | 1,20,316 | 6 | 2,43,027 |
बेळगाव ग्रामीण | 1,24,158 | 1,19,922 | 4 | 2,44,084 |
सौंदत्ती | 99,145 | 98,239 | 0 | 1,97,384 |
रामदुर्ग | 1,05,010 | 1,01,565 | 11 | 2,06,586 |
एकूण | 9,11,033 | 9,02,476 | 58 | 18,13,567 |
मतदारसंघ, एकूण मतदान केंद्रे
मतदारसंघ | एकूण मतदार केंदे | संवेदनशील मतदान केंद्रs | अतिसंवेदनशील मतदान केंद्रे | एकूण सीसीटीव्ही कॅमेरे |
अरभावी | 345 | 63 | 6 | 23 |
गोकाक | 356 | 102 | 27 | 16 |
बेळगाव उत्तर | 340 | 99 | 20 | 13 |
बेळगाव दक्षिण | 336 | 233 | 12 | 15 |
बेळगाव ग्रामीण | 353 | 5 | 20 | 32 |
बैलहोंगल | 267 | 39 | 5 | 14 |
सौंदत्ती | 280 | 20 | 11 | 26 |
रामदुर्ग | 289 | 26 | 17 | 20 |
एकूण | 2,566 | 587 | 118 | 159 |