प्रतिनिधी /पणजी
देशातील वाढत्या लैंगिक अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी ओल्ड गोवा येथील गांधी चौकात मेणबत्ती मार्च काढण्यात आला. आरटीआय, सामाजिक कार्यकर्त्यांच्यावतीने हा मार्च आयोजित करण्यात आला होता. बेळगाव येथे तीन वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाला. तिला न्याय देण्याची मगणी करण्यात आली.
गोव्यातही अलिकडेच लैंगिक अत्याचाराची प्रकरणे वाढली असून त्याबाबत चिंता प्रकट करण्यात आली. त्या प्रकरणाचा वेगाने तपास करुन दोषींना पकडा आणि कारवाई करावी, अशी मागणी झाली. त्यानंतर ओल्ड गोवा परिसरात मार्च काढण्यात आला.