ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी विनय कुमार याने आपल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे.
दरम्यान, 7 जानेवारीला दिल्ली हायकोर्टाने या प्रकरणातील चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. या चार दोषींना 22 जानेवारी या दिवशी फाशी देण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. तसेच, या चारही आरोपींना अन्य पर्यायांचा विचार करायचा असल्यास 14 दिवसांचा अवधी कोर्टाने दिला होता.
दरम्यान, आज निर्भया बलात्कार प्रकरणातील एका आरोपीनं सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका दाखल केली असून त्यानं 22 जानेवारी रोजी देण्यात येणारी फाशी थांबवण्याची मागणी केली आहे.