ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश सिंह याची दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली आहे. मुकेश सिंह याने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता.
दरम्यान, त्याआधी दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी मुकेश याची दया याचिका फेटाळून लावली होती. या प्रकरणात, मुकेश याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याने खालच्या न्यायालयातील डेथ वॉरंट फेटाळण्याची मागणी या याचिकेद्वारे केली होती.
सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर आरोपींनी फाशीपासून बचाव व्हावा म्हणून अखेरचा मार्ग म्हणून सर्वोच्च न्यायालयात क्युरेटीव्ही याचिका दाखल केली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटळली होती. त्यानंतर मुकेश या दोषीने राष्ट्रपतींकडे दया याचिका दाखल केली होती. तेथेही त्याला अपयश आले आहे. त्यामुळे त्याची फाशी कायम राहणार आहे.
या प्रकरणावर राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप निर्भयाची आई आशा देवी यांनी केला आहे. मी आतापर्यंत राजकीय चर्चा केली नाही. मात्र, आता सांगू इच्छतो की, ज्या लोकांनी 2012 मध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केले, तेच लोक आज माझ्या मुलीच्या मृत्यूवर राजकीय फायदा घेण्यासाठी खेळत आहेत, असे आशा देवी यांनी म्हटले आहे.