प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊन काळात अनेकांचे खाण्यापिण्याविना हाल होत आहेत. अशा काळात विविध संघ-संस्था मदतीसाठी पुढे सरसावलेल्या पाहायला मिळत आहेत. निर्मल फौंडेशनचे सामाजिक कार्यकर्ते प्रकाश लोहार यांच्यावतीने गरजूंना अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले. भोबे मित्र मंडळाचे बबन भोबे यांच्या हस्ते या अल्पोपाहाराचे वाटप करण्यात आले.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून फौंडेशनचा हा उपक्रम सुरू असून लॉकडाऊन संपेपर्यंत सुरू राहणार आहे.
या प्रसंगी भास्कर पाटील, विनायक चौगुले, विनायक सुतार, विशाल सुतार, प्रकाश लोहार, मिलिंद जाधव, धनंजय पाटील, सचिन निर्मळकर, चौगुले आदी उपस्थित होते.