पेट्रेलियम, लेदर, इंजिनिअरिंग अन्य क्षेत्रावर कोरोनाचा प्रभाव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना संसर्गाच्या वाढत्या वेगामुळे भारताच्या निर्यात क्षेत्रात घसरणीचा प्रवास सहाव्या महिन्यातही कायम राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये ऑगस्ट महिन्यात निर्यातीत 12.7 टक्क्मयांची घसरण नोंदवत ऑगस्टमध्ये निर्यात 1.67 लाख कोटींवर स्थिरावली आहे. यासंदर्भातील माहिती नुकतीच सरकारकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीमधून मिळाली आहे.
ऑगस्ट महिन्यात व्यापारी तोटा हा 49.83 हजार कोटींवर राहिला आहे. जो तोटा मागील वर्षातील समान कालावधीत 1 लाख कोटींवर राहिला होता. तसेच सोने आयात वाढून 27.23 हजार कोटींवर राहिली आहे. परंतु हाच आकडा मागील वर्षातील समान काळात 10 हजार कोटींवर राहिला असल्याची माहिती उपलब्ध आकडेवारीतून देण्यात आली आहे. अनलॉकच्या निर्णयामुळे काही प्रमाणात अर्थव्यवस्थेत सुधारणा पहावयास मिळत असल्याची माहिती तज्ञांनी व्यक्त केली आहे.
प्रमुख क्षेत्रात घसरण
ऑगस्ट महिन्यात आलेल्या घसरणीचा प्रभाव हा प्रामुख्याने पेट्रोलियम, लेदर, इंजिनिअरिंगचे साहित्य, जेम ऍण्ड ज्वेलरी आदींच्या शिपमेंटमध्ये जाणवला आहे. तर निर्यात क्षेत्रातही घसरण राहिली असून जवळपास 26 टक्क्मयांची यात घट नोंदवत 2.16 लाख कोटांवर आयात स्थिरावली आहे.