क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
निलजी येथे ब्रम्हलिंग कुस्तीगीर संघटना आयोजित श्री ब्रम्हलिंग यात्रेनिमित्त विराट कुस्त्यांचे जंगी मैदान गुरूवार दि. 14 एप्रिल रोजी ब्रम्हलिंग आखाडा निलजी येथे आयोजित करण्यात आला आहे.
या आखाडय़ातील प्रमुख कुस्ती हरियाणा केसरी सन्नी जॉन व युवा महाराष्ट्र केसरी विष्णू खोशे यांच्यात होणार आहे. दुसऱया क्रमांकाची कुस्ती कर्नाटक केसरी सेनादलचा विनोद बडकुंद्री व राष्ट्रीय चॅम्पियन विजयकुमार हरियाणा यांच्यात, तिसरी अ कुस्ती किर्तीकुमार कार्वे (कंग्राळी) व लिंगराज होनमाने (कोल्हापूर), तिसरी ब कुस्तीत वैभव फाळके (पुणे) व निशांत पाटील (सेनादल), चौथ्या क्रमांकाची कुस्ती किरण अष्टगी (कलखांब) व विक्रम शिनोळी (कोल्हापूर), पाचव्या क्रमांकाची कुस्ती संजय तुमकुरे (पुणे) व सुशांत मुतगेकर (कंग्राळी), सहाव्या क्रमांकाची कुस्ती प्रणीत पाटील (निलजी) व अक्षय जाधव (कोल्हापूर), सातव्या क्रमांकाची कुस्ती महांतेश पाटील (कोल्हापूर) व संकल्प हेळवे (कंग्राळी), आठव्या क्रमांकासाठी विजय चिम्मड व निरंजन पाटील (येळ्ळूर), नवव्या क्रमांकासाठी विक्रम तुर्केवाडी व राहुल कुंकारे (कोल्हापूर), दहाव्या क्रमांकाची कुस्ती महादेव दरेण्णावर (भांदुर गल्ली) व पृथ्वीराज पाटील (कोल्हापूर) यांच्यात होणार आहे. यांशिवाय 50 हून अधिक कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे.