वार्ताहर / सांबरा
निलजी येथील स्मशानभूमीत ‘डाबोया’ या जातीच्या घोणस सापाला शिताफीने पकडण्यात सर्पमित्र गणेश दड्डीकर यांना यश आले.
गेले कित्येक दिवस हा विषारी साप या परिसरात वावरत असल्याने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले होते. काल निलजी येथे एका महिलेचे वृद्धापकाळाने निधन झाल्याने काही तरुणांनी या भागातील साफसफाईचा बेत आखला होता. सफाई करताना त्यांच्या नजरेस हा घोणस साप दिसून आल्याने त्यांनी ताबडतोब सर्पमित्र गणेश दड्डीकर यांना बोलावून घेतले. गणेश दड्डीकर यांनी शिताफीने सापला पकडले. सदर साप मादी असल्याने परिसरात या सापाची पिले असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. सापाला जांबोटी जंगलात सोडून देण्यात येणार असल्याचे दड्डीकर यांनी सांगितले.