भाजपाकडून लढवणार निवडणूक ?
ऑनलाईन टीम / तरुण भारत
उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मनिपूरमध्ये विधानसभा निवडणुकींसाठी तारखा जाहीर करण्यात आल्या असून पाच राज्यांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर देशात राजकीय पक्षांची तयारी सुरु झाली आहे. . उत्तर प्रदेशची निवडणुक सर्वात महत्त्वाची मानली जात आहे. हेच निमीत्त साधून कानपूरचे पोलीस आयुक्त असीम अरुण यांनी आठ जानेवारी रोजी स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज केला असून त्यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याबाबत वक्तव्य केले आहे.
लखनऊमध्ये कार्यरत असलेल्या राजेश्वर सिंह यांनी गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज अर्ज केला होता. राजेश्वर सिंह आगामी उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतात, मात्र, या संदर्भात राजेश्वर सिंह यांच्याकडून अद्याप काहीही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही.
राजेश्वर सिंह यांनी सहाराचे प्रमुख सुब्रत रॉय आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांच्यावरील कारवाईमुळे चर्चेत राहिले आहेत. राजेश्वर सिंह यांच्यावरही बेहिशोबी मालमत्तेचे आरोप होते. या आरोपांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणीही झाली. कॉमनवेल्थ गेम्स, टूजी स्पेक्ट्रम आणि कोळसा घोटाळा यांसारख्या प्रकरणांच्या तपासातही राजेश्वर सिंह यांचा सहभाग आहे. राजेश्वर सिंह हे मूळचा उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील पाखरौली येथील आहे. त्यांनी बी.टेक.ची पदवी घेतली आहे. ईडीमध्ये रुजू झाल्यानंतरच त्यांचे नाव हायप्रोफाईल प्रकरणांशी जोडले जात होते.