कार्यालयांना भेटी देऊन घेतला कामकाजाचा आढावा
प्रतिनिधी / बेळगाव
महापालिका निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून, विविध ठिकाणी निवडणूक कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. महापालिकेच्या निवडणूक कार्यालयांना भेटी देऊन कामकाजाचा आढावा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी बुधवारी घेतला. यावेळी त्यांनी अधिकाऱयांना विविध सूचना केल्या.
महापालिका निवडणुका घेण्याची घोषणा केल्यानंतर मनपा प्रशासनाच्या कामकाजाला गती आली आहे. तातडीने निवडणूक अधिकारी व साहाय्यक निवडणूक अधिकाऱयांची नियुक्ती करून प्रत्येक 5 वॉर्डकरिता एक निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आले आहे. महापालिका मुख्य कार्यालय, अशोकनगर, कोनवाळ गल्ली, गोवावेस येथील मनपा व्यापारी संकुल, महापालिका जुने कार्यालय आदी ठिकाणी निवडणूक कार्यालये सुरू करण्यात आली आहेत.
या कार्यालयांना बुधवारी दुपारी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी भेट देऊन कारभाराची माहिती घेतली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱयांकडून माहिती जाणून घेतली. तसेच कोरोना नियमावली आणि निवडणूक आचारसंहिता पालनाच्या सूचना
केल्या.
यावेळी महापालिका अधीक्षक अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर, कौन्सिल सेपेटरी बन्सी, साहाय्यक कौन्सिल्स सेपेटरी एफ. बी. पिरजादे आदींसह मनपाचे अधिकारी उपस्थित होते.