बेळगाव / प्रतिनिधी
ग्राम पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक-महाराष्ट्र सीमा हद्दीवर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मद्य तस्करी आणि पैशांची ने-आण रोखण्यासाठी वाहनांची कसून तपासणी होत आहे. निवडणुकीत गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी बेकिनकेरे येथील अतिवाड क्रॉसजवळ महाराष्ट्र-कर्नाटक सीमा हद्दीवर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातून कर्नाटक येणाऱया प्रवाशांची संख्या अधिक आहे. त्यामुळे उचगाव -कोवाड मार्गावरून महाराष्ट्रातून कर्नाटकात आणि कर्नाटकातून महाराष्ट्रात ये-जा करणाऱया वाहनांसह प्रवाशांची संख्या अधिक आहे. दरम्यान, निवडणुकीच्या काळात मद्य वाहतूक मोठय़ा प्रमाणात केली जाते. अशा वाहनांवर नजर ठेवण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली आहे. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनांची व वाहनातील साहित्याची तपासणी केली जात आहे. त्याबरोबरच वाहनांची नोंद ठेवली जात आहे. रात्रंदिवस पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आल्याने गैरवाहतूक करणाऱया वाहनांना आळा बसला आहे.