वार्ताहर / मौजेदापोली
दापोलीत निवडणूकीत अनेक ठिकाणी उमेदवारांची प्रतिष्ठापणाला लागली आहे. मात्र प्रचारात रंगत आलेली असताना पावसाने मध्येच खो घातला आहे. त्यामुळे एक दिवस पूर्ण वाया गेल्याचे समोर आले.
दापोलीत होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीत अनेक प्रतिष्ठीत व्यक्तीमत्व असलेल्या व्यक्ती आपल्या विजयासाठी अनेकांना जावून भेटत आहेत. दापोलीतील काही ग्रामपंचायतीचे माजी सरपंच हे बिनविरोध निवडणून आले आहेत. तर काही माजी सरपंच समोरासमोर आले आहेत. मात्र गुरूवारी सरींवर सरी पाऊस कोसळ्याने अनेकांची धावपळ उडाली होती. पावसामुळे अनेक उमेदवारांनी भेटीगाठी करण्याचे काम थांबले. त्यामुळे प्रचाराची गती पुर्ण एक दिवस थांबली होती.
शुकवारी सकाळ पासून दापोलीत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यात आणखी तीन दिवस कोकणात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने उमेदवारांची धाकधुक वाढली आहे. पावसाने जर जोर पडकडला तर फिरून पचार कसा करायचा असा पश्न उमेदवारांना पडला आहे.