ग्रामीण भागातील प्रकाराने अनेक इच्छुकांत भीती : बडय़ा माजी सदस्यांना धरून होतेय पार्टी
प्रतिनिधी / बेळगाव
निवडणुकांचे बिगुल वाजले असून आता अनेक इच्छुकांनी मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काही ग्राम पंचायतचे माजी सदस्य चक्क निवडणूक अधिकाऱयांना पार्टी देत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे नवीन इच्छुक उमेदवारांमध्ये भीती निर्माण झाली असून निवडणूक अधिकारी काही गैरप्रकार तर करणार नाहीत ना, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकारामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.
निवडणूक अधिकारीच पार्टी करतात तेव्हा मात्र सर्व इच्छुक उमेदवार भीतीच्या छायेखाली वावरताना दिसून येत आहेत. तालुक्मयातील दक्षिण भागात हा प्रकार घडला आहे. बेळगाव जिह्यात दोन टप्प्यात मतदान करण्यात येणार आहे. दि. 22 डिसेंबर व 27 डिसेंबर रोजी हे मतदान होणार आहे. त्यामुळे इच्छुकांची भाऊगर्दी होत आहे. ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात मोठय़ा प्रमाणात चुरस निर्माण झाली आहे. परिणामी मीच निवडून येणार, असा भास साऱयांनाच होत आहे. मात्र, मतदारांच्या कौलानंतरच अनेकांचे भवितव्य ठरणार आहे.
सध्या ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी ग्राम पंचायत कार्यक्षेत्रात मोठी चुरस निर्माण होत आहे. अर्ज भरलेल्यांनी आतापासून प्रचाराला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी अर्ज भरण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे ज्या ग्राम पंचायतमध्ये निवडणूक अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे त्यांच्यावर मोठी जबाबदारी आहे. मात्र काही ठिकाणी हे अधिकारीच ओल्या पाटर्य़ा करत असल्याचे उघडकीस येत आहे. तेव्हा अशा प्रकारांकडे तालुका आचारसंहिता नोडल अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
बेळगाव तालुक्मयात आतापासून मोठय़ा प्रमाणात निवडणुकांना वेग आला आहे. इच्छुक उमेदवारांनी प्रचाराला गती दिली आहे. अजून अर्ज छाननी झाली नसली तरी अनेकांनी प्रचार करण्यावर भर दिला आहे. अर्ज भरण्यासाठी लागणाऱया प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी धावपळ उडत आहे. मात्र, काही ग्राम पंचायतमध्ये निवडणूक अधिकारीच पाटर्य़ा करत असल्याचे उघडकीस येत आहे. त्यामुळे हा एक चर्चेचा विषय बनला असून याकडे वरि÷ अधिकाऱयांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.