देसूर ग्राम पंचायत निवडणूक बुथवरील घटनेने खळबळ
प्रतिनिधी/ बेळगाव
देसूर ग्राम पंचायतीच्या निवडणूक बुथवर एका निवडणूक अधिकाऱयाकडेच रिव्हॉल्वर आढळल्याने एकच खळबळ उडाली असून तातडीने ती रिव्हॉल्वर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहे. देसूरमधूनच मतपत्रिका बाहेर पडल्यामुळे गोंधळ उडाला होता. त्यानंतर मतदाना दिवशी हा गोंधळ उडाल्याने देसूर गावची ग्राम पंचायत निवडणूक म्हणजे चर्चेचा विषय ठरली आहे.
दोन दिवसांपूर्वी येथे मतपत्रिका फुटली म्हणून गोंधळ उडाला होता. या प्रकरणी जिल्हाधिकाऱयांना त्याची माहिती देवून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर दि. 22 डिसेंबर रोजी मतदान असताना एका निवडणूक अधिकाऱयाकडेच रिव्हॉल्वर असल्याचे आढळून आले. त्यामुळे इतर अधिकारी व कर्मचाऱयांनी तातडीने त्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी व पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी ती रिव्हॉल्वर ताब्यात घेतली आहे.
निवडणूक काळात रिव्हॉल्वर, बंदुका, घातक शस्त्रs यांच्यावर निर्बंध घातलेले असतात. मुख्य म्हणजे निवडणूक केंद्राजवळ कोणत्याही प्रकारचा गोंधळ होवू नये यासाठी काटेकोर तपासणी केली जाते. तसेच 100 मीटर अंतरापर्यंत मतदार वगळता कोणालाही प्रवेश नसतो. निवडणूक जाहीर झाल्यानंतर बंदुका जमा करण्याचे आदेश दिले जातात. असे असताना एका निवडणूक अधिकाऱयानेच ही रिव्हॉल्वर चक्क मतदान केंद्रामध्ये नेल्याने देसूरमध्ये मंगळवारी सकाळीच मोठा गोंधळ उडाला. या घटनेनंतर तातडीने दखल घेवून बेळगाव ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी जावून ती रिव्हॉल्वर ताब्यात घेतली आहे. याचबरोबर संबंधित अधिकाऱयावर देखील कारवाई करण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.