प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील निवळी-जयगड मार्गावरील निवळी दत्त मंदिर येथे ट्रक उलटून झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल़ा ही घटना मंगळवारी दुपारी 12 च्या सुमारास घडल़ी श्रीराम प्रसादे (52, देवरुख) असे मृताचे नाव आह़े या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आली आह़े .
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीराम प्रसादे मंगळवारी मासेबाव येथून धान्य घेऊन संगमेश्वरला जात होत़े निवळी दत्त मंदिर येथील वळणावर त्यांचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रकसमोरील डोंगरावर आदळल़ा या अपघातात ट्रकच्या समोरील भागाचा चक्काचूर झाला व चालक श्रीराम यांना गंभीर दुखापत झाल़ी त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असता वैद्यकीय अधिकाऱयांनी मृत घोषित केल़े या प्रकरणी पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल झगडे करत आहेत़