अल्पसंख्याक निवासी शाळांना लाभ : शासनाचा निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
विद्यार्थ्यांना सकस आहार मिळावा, याकरिता मध्यान्ह आहारामध्ये विविध पदार्थांचा समावेश करण्यासाठी शासनाचा प्रयत्न सुरू आहे. अल्पसंख्याकांच्या निवासी शाळांमध्ये लवकरच नाचणीपासून तयार होणारे उपपदार्थ दिले जाणार आहेत.
विविध ठिकाणी अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी निवासी वसतिगृहे सुरू आहेत. या ठिकाणी शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांना जेवणाची व्यवस्था केली जाते. शिवाय सकाळी नाष्टा तर दुपारी आणि रात्री जेवण दिले जाते. या जेवणामध्ये आता नाचणीपासून बनविलेल्या उपपदार्थांचा समावेश असणार आहे. विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी कर्मचारी कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे भोजन उपलब्ध होत आहे. आता जेवणामध्ये नाचणीची भाकरी, आंबिल आणि पापड दिले जाणार आहेत.
नाचणी पौष्टिक धान्य मानले जाते. शिवाय आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आहारात प्रामुख्याने नाचणीचा वापर केला जातो. आता वसतिगृह शाळांमधील जेवणामध्येही नाचणीचा वापर केला जाणार आहे. सरकारी शाळांमध्ये मध्यान्ह आहार दिला जातो तर निवासी शाळांमध्ये जेवणामध्ये नाचणीच्या पदार्थांचा समावेश असणार आहे.