प्रतिनिधी / बेळगाव
येथील माळमारुती पोलीस स्थानकातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व एका हवालदाराचा निवृत्तीनिमित्त हृद्य सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या भावी जीवनाला शुभेच्छा देण्यात आल्या.
साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पी. एम. शिली 35 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून तर हवालदार एन. एस. अगसगी हे 25 वर्षांच्या सेवेतून निवृत्त झाले. निवृत्तीनिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. बेळगाव पोलीस आयुक्त कार्यक्षेत्रातील निवृत्त झालेल्या अधिकारी व पोलिसांना आयुक्त डॉ. के. त्यागराजन यांनी निवृत्तीचे जीवन सुखमय होवो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.