प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनच्या परिस्थितीत गरजु लोकांना जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात येत आहे. वाडा कंपाऊंड वडगाव येथील निवृत्त मुख्याध्यापिका श्रीमती जयश्री विजय शिंदगी यांनी एक महिन्याची 30 हजार रूपयाच्या पेन्शनची रक्कम या भागातील गरीब गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तुंसाठी दिली आहे. या रकमेतून भाजीपाला, तांदूळ यासह अन्य वस्तु वडगाव परिसरातील गरजू लोकांना वाटप करण्यात आले.
या कार्यात सोनारगल्ली येथील जय गणेश युवक मंडळ व रामदेव गल्ली येथील स्वराज्य युवक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. आणि जीवनावश्यक साहित्य गरजू लोकांच्या घरोघरी जाऊन वाटप करण्यात आले. दरम्यान निवृत्त मुख्याध्यापिका जयश्री शिंदगी यांच्या मदतीबद्दल कौतुक करण्यात येत आहे.