प्रतिनिधी/ रत्नागिरी
तालुक्यातील वरची निवेंडी येथे जीतीवाचक शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी चौघा जणांना मंगळवारी अटक करण्यात आल़ी उपविभागिय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी ही कारवाई केल़ी मंगळवारी संशयित आरापिंना न्यायालयापुढे हजर करण्यात आल़े यावेळी न्यायालयाने संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावल़ी
निवेंडी येथील अर्जुन हिरू कदम (70, ऱा निवेंडी बौद्धवाडी) यांना पैशाच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ व मारहाण करण्यात आली होत़ी याप्रकरणी जयगड पोलिसांनी योगेंद्र श्रीनिवास कुलकर्णी (ऱा निवेंडी) व त्यांच्या 3 कामगारांविरूद्ध ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल़ा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार यांनी आरोपी यांच्याकडून 5 हजार रूपयांची रक्कम उसनी घेतली होत़ी 10 जानेवारी रोजी आरोपीत हे तक्रारदार यांच्याकडे आपली रक्कम मागण्यासाठी गेले होत़े यावेळी तक्रारदार यांनी सध्या कोरोना काळात आपल्याला काम नाही त्यामुळे तुमचे थोडे थोडे करून पैसे देतो असे सांगितल़े
तक्रारदार यांनी पैसे न दिल्याचा राग आल्याने आरोपीत याने तक्रारदार यांना मारहाण केल़ी तसेच जातीवाचक शिवीगाळ केली अशी तक्रार अर्जुन कदम यांनी जयगड पोलिसांत दाखल केली होत़ी त्यानुसार मंगळवारी या गुह्याचा तपास करणारे उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांनी संशयित आरोपींना अटक करून न्यायालयापुढे हजर केल़े
पिडीत कुटुंबावर दबाव टाकणाऱयांवर कारवाईची मागणी
संशयित आरापी योगेद्र कुलकर्णी याच्यावर गुन्हा दाखल होवू नये यासाठी समाजातील लोक पुढाकार घेवून आपल्यावर व कुटुंबावर दबाव आणत होत़े यासाठी एक चाफे याठिकाणी एक बैठक देखील घेण्यात आली होत़ी आपल्याला केवळ हुलकावणी देण्यात आली मात्र न्याय मिळाला नाह़ी अशी तक्रार अर्जुन कदम यांच्या मुलीने केली होत़ी त्यानुसार पिडीत कुटुंबावर दबाव आणणाऱयांवर देखील कारवाई करावी अशी मागणी बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क चे जिल्हा प्रभारी अशोक पवार यांनी निवेदनाद्वारे केली आह़े