ऑनलाईन टीम / बेंगळूर :
डिजिट इन्शुरन्स कंपनीने निसर्ग चक्रीवादळाचे दावे निकाली काढण्यासाठी झटपट कार्यवाही सुरू केली आहे. नुकसानीच्या दाव्यावर नजर ठेवण्यासाठी कंपनीने 4 नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. कोरोनाविषाणूच्या साथीमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या पार्श्वभूमीवर डिजिटने झिरो-टच दाव्यांची सुविधा देऊ केली आहे. ऑडिओ क्लेम्समुळे हे शक्य होत आहे. दस्तावेज सॉफ्ट प्रतींच्या स्वरूपात सादर करता येतील आणि २४×७ मदत उपलब्ध असेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले.
डिजिटची झिरो-टच दावा प्रक्रिया ही पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस प्रक्रिया असून, यामध्ये ऑडिओ क्लेम्समुळे कोणताही फॉर्म भरण्याची, दाव्यासाठी पुरावा म्हणून प्रत्यक्ष प्रती पाठवण्याची गरज नाही. यामध्ये एक स्मार्टफोन एनेबल्ड स्वयंनिरीक्षण ॲप आहे. या ॲपद्वारे ग्राहकांना आपल्या वाहनांची तपासणी स्वत:च करता येते. याशिवाय मशिन लर्निंग, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि इमेज ॲनालिटिक्स या तंत्रज्ञानांची डिजिटला दावे मंजूर करण्यासाठी किंवा दाव्यांवर प्रक्रिया करण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे वाहनासारख्या उत्पादनांसाठी एकंदर दावे निकाली काढण्याची प्रक्रिया वेगवान झाली आहे.
डिजिट इन्शुरन्सचे संस्थापक आणि अध्यक्ष कामेश गोयल म्हणाले, एक विमाकंपनी म्हणून ग्राहकांच्या पाठीशी उभे राहण्याची आणि त्यांनी ज्यासाठी आमच्यावरविश्वास टाकला ते करून दाखवण्याची अर्थातच त्यांचे दावे अखंडितपणे निकाली काढण्याची हीच वेळ आहे. म्हणूनच आम्ही ग्राहकांसाठी २४×७ उपलब्ध आहोत आणि शक्य तेवढ्या लवकर दावे निकाली काढत आहोत.नियामक यंत्रणेने निसर्ग दाव्यांसाठी दिलेल्या सूचनांच्या मर्यादेत राहून डिजिट इन्शुरन्स वेगाने कार्यवाही करत आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच अम्फान चक्रीवादळाशी संबंधित दावे हाताळण्यासाठीही याच प्रकारची कार्यवाही कंपनीने केली होती.